विरार हुक्का पार्लरवर पोलिसांची छापेमारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विरारमधील पांढरपेशा वस्तीतील हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुरुवारी टाकलेल्या धाडीत 27 जणांना ताब्यात घेतले आहे. वसई विरार महानगरातील याआधी डीसी क्लबवर कारवाई करण्यात आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पालघरच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एस.हेगाजे यांना हुक्का पार्लर सुरु असल्याचे समजले. सायंकाळच्या सुमारास पोलीस पथकाने सापळा रचून […]

विरार हुक्का पार्लरवर पोलिसांची छापेमारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विरारमधील पांढरपेशा वस्तीतील हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुरुवारी टाकलेल्या धाडीत 27 जणांना ताब्यात घेतले आहे. वसई विरार महानगरातील याआधी डीसी क्लबवर कारवाई करण्यात आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पालघरच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एस.हेगाजे यांना हुक्का पार्लर सुरु असल्याचे समजले.

सायंकाळच्या सुमारास पोलीस पथकाने सापळा रचून उच्चभ्रू वस्तीतील विरारमधील डीमार्ट जवळील ओसिस कॅफे या हुक्का पार्लरवर धाड टाकली असता रूम मध्ये तरुण हुक्का ओढताना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी छाप्यात मिळालेल्या तरुणांना ताब्यात घेऊन समज देऊन शनिवारी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number