विरारमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विरारमध्ये 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.
घरात मुलगी एकटी असताना शेजारी राहणाऱ्या 32 वर्षीय इसमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कोणालाही न सांगण्यासाठी तिला धमकावले. मुलीची आई अचानक घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
विरार पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा गुन्ह्यांविरोधात कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.