70 रुपयांची पैज बेतली जीवावर !

जय महाराष्ट्र न्यूज, विरार एका शुल्लक पैजेपायी विरार इथे राहणाऱ्या मानवेल पाडा परिसरातील एकाने आपला जीव गमावला आहे. फक्त 70 रुपयांची पैज या तरुणाच्या जीवावर बेतली आहे.   सुरेश प्रजापती असे या 35 वर्षीय तरुणाचे नाव असून, राणी तलावात कुस्तीची शर्यत खेळून नंतर तलावात पोहण्यासाठी 70 रुपयांची पैज लावण्यात आली होती. तलावाच्या एका टोकावरून दुसऱ्या […]

70 रुपयांची पैज बेतली जीवावर !

जय महाराष्ट्र न्यूज, विरार

एका शुल्लक पैजेपायी विरार इथे राहणाऱ्या मानवेल पाडा परिसरातील एकाने आपला जीव गमावला आहे. फक्त 70 रुपयांची पैज या तरुणाच्या जीवावर बेतली आहे.

 

सुरेश प्रजापती असे या 35 वर्षीय तरुणाचे नाव असून, राणी तलावात कुस्तीची शर्यत खेळून नंतर तलावात पोहण्यासाठी 70 रुपयांची पैज लावण्यात आली होती. तलावाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत पोहण्याच्या शर्यतीमध्ये अर्ध्या वाटेत श्वास कोंडल्याने या तरुणाचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

 

वसई विरार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, भर पावसात उभे राहून जवानांनच्या अथक प्रयत्नानंतर सुरेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number