नागपूरात दुचाकीवर अश्लील चाळे करणारा व्हिडिओ व्हायरल

उपराजधानी असलेल्या नागपूरात दुचाकीवर अश्लील चाळे करणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

नागपूरात दुचाकीवर अश्लील चाळे करणारा व्हिडिओ व्हायरल

नागपूर : उपराजधानी असलेल्या नागपूरात दुचाकीवर अश्लील चाळे करणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी चारचाकीमध्ये अश्लील चाळे करणारा व्हिडिओ समोर आला होता. या घटनेला आठवडा उलटला नाही तोच तशीच दुसरी घटना घडली. या घटनेत दुचाकीवर अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेतील आरोपीचे नाव हर्ष उर्फ बिल्ली राजेश कहर असे असून तो कुख्यात गुंड आहे. 

काही दिवसांपूर्वी हा आरोपी दुचाकीच्या पेट्रोल टॅंकवर बसून प्रेयसीसोबत अश्लील चाळे करत सदर पोलिसांच्या हद्दीत दुचाकीवरून फिरला. काही लोकांनी त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला. हा व्हिडिओ बघून पोलिसांनी त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला. मुख्य म्हणजे हा आरोपी एक महिना अगोदरच एका प्रकरणातून कारागृहातून बाहेर आला होता. सदर प्रकरणात सदर पोलिसांनी प्रेयसी आणि बिल्लीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number