सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यातही काही व्हिडिओ असे असतात जे कितीही वेळा पहिले तरी मन मात्र भरत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक भावनिक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी नव्याने प्रेमात पडलेत असं म्हणायला हरकत नाही. अपलावधीतच हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक वृद्ध जोडपे पाहायला मिळते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत वयोवृध्द पती-पत्नी यांच्यामध्ये चीरतरुण असलेल्या प्रेमाची भावना प्रकर्षानं दिसून येते. सध्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका ट्रेनमधील असून यात चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असूनही ट्रेनमध्ये पती आपल्या पत्नीची आत्मीयतेने काळजी घेताना दिसत आहे.
हा व्हिडीओ राकेश मैनी नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. वयोवृध्द पत्नी आजारी असल्यामुळे वयोवृध्द पती काळजी घेत असल्यासागे यात दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर कंमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे.