‘त्या’ मुलीवर गुन्हा दाखल, पण तिची मुजोरी कायम!

मंगळवारी लोकल ट्रेनमधून पडणाऱ्या तरुणीचा आणि तिला वेळीच पकडणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. ही तरुणी 17 वर्षांची असून तिचं नाव पूजा भोसले आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून पूजावर कारवाई करण्यात आली आहे. या संबंधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मात्र पूजाला पोलिसांनी अटक केलेली नाही. पण आज पूजाला जुव्हेनाईल कोर्टात हजर करणार आहेत. […]

‘त्या’ मुलीवर गुन्हा दाखल, पण तिची मुजोरी कायम!

मंगळवारी लोकल ट्रेनमधून पडणाऱ्या तरुणीचा आणि तिला वेळीच पकडणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. ही तरुणी 17 वर्षांची असून तिचं नाव पूजा भोसले आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून पूजावर कारवाई करण्यात आली आहे. या संबंधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मात्र पूजाला पोलिसांनी अटक केलेली नाही. पण आज पूजाला जुव्हेनाईल कोर्टात हजर करणार आहेत.

या मुलीचं नाव पूजा भोसले असून ती भायखळा परिसरात राहते. सोमवारी ती दिवा इथं राहणाऱ्या तिच्या मित्राला भेटण्यासाठी निघाली होती. यावेळी घाटकोपर-विक्रोळी रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलच्या दरवाजात उभी होती. त्यावेळी तिचा हात सुटला आणि ती थेट खाली पडली. मात्र यावेळी तिच्या बाजूला उभ्या असलेल्या सहप्रवाशांनी तिला वाचवलं. हा प्रकार एका प्रवाशाने मोबाईलमध्ये चित्रित केला आणि हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

मात्र या घटनेनंतर पश्चात्ताप करण्याऐवजी पूजा मात्र वेगळ्याच अविर्भावात मीडियापुढं आली. “ज्याने वाचवलं तो देवमाणूस होता यात वाद नाही, पण ज्याने माझा व्हिडीओ काढून सोशल माध्यमावर पसरवला, त्याचा मला पत्ता मला द्या, त्याला मी सोडणार नाही”, असा पवित्रा तिनं घेतला. तसंच शूटिंग करण्याऐवजी तो मला वाचवू शकत नव्हता का? असाही प्रश्न तिने केला.

दारात उभं राहणं ही तुझी चूक होती का? याबाबत विचारलं असता, मी केवळ हात झटकण्याचा प्रयत्न केला आणि पडले, यात काय चूक आहे? असा प्रतिप्रश्न तिने केला. उलट रेल्वे प्रशासनच याला जबाबदार असून मेट्रोप्रमाणे लोकल ट्रेनलाही बंद होणारे दरवाजे बसवण्यात यावेत अशी मागणी तिने केली आहे. जर दरवाजा बंद असता, तर आपण पडलोच नसतो, असंही तिनं म्हटलंय.

ट्रेनमधून तोल गेल्यामुळे पूजाच्या हाताला दुखापत झाली आहे. पोलिसांनी पूजाला अटक केलं नसलं, तरी पूजावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number