मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांनी पीएमएलए न्यायालयाने समन्स जारी केले आहे. या समन्समध्ये त्यांना ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे आरोप केले आहे. त्यानंतर तपास यंत्रणाकडून अनिल देशमुखांची चौकशी सुरू आहे.
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी पार पडली. तसेच अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने समन्स जारी केला आहे.