शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन?

ध्वनिप्रदूषणाचे आणि शांतता क्षेत्रांचे नियम लागू असतानाही दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन झालेले दिसले, तेही मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात… निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा 55 डेसिबल इतकी असणे गरजेचे आहे, मात्र दसरा मेळाव्यात ही मर्यादा ओलांडली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणामधील आवाज 88 डेसिबल होता,असा दावा आवाज फाउंडेशनने केला आहे. त्यामुळे शिवसेनेने […]

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन?

ध्वनिप्रदूषणाचे आणि शांतता क्षेत्रांचे नियम लागू असतानाही दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन झालेले दिसले, तेही मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात…

निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा 55 डेसिबल इतकी असणे गरजेचे आहे, मात्र दसरा मेळाव्यात ही मर्यादा ओलांडली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणामधील आवाज 88 डेसिबल होता,असा दावा आवाज फाउंडेशनने केला आहे.

त्यामुळे शिवसेनेने उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे आवाज फाऊंडेशनचे म्हणणे आहे.

ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या नियमांनुसार निवासी परिसरात ५५ डेसिबल तर शाळा, रुग्णालय, न्यायालय व मंदिर यांच्या आजुबाजूच्या परिसरातील शांतताक्षेत्रात ५० डेसिबल आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. त्यातही रात्री दहानंतर निवासी परिसरात ५० डेसिबल तर शांतता क्षेत्रात ४५ डेसिबलची मर्यादा आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number