जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मुर्तीचा वाद अजून काही संपल्याचं दिसून येत नाही. अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याचे आणि त्याला जबाबदार पुजारी असल्याचा आरोप होत
आहे.
मात्र, असे आरोप होत असताना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुर्तीची झीज झालीच नसल्याचं खुलासा केला. तावडे यांनी केलेला खुलासा खोटा असल्याचा
आरोप होत आहे.
तसेच माहिती न घेता हा खुलासा करणे अंत्यत चुकीचा आहे अशी टीका उमटू लागली. पुजारी हटाव संघर्ष समितीने कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन तावडे यांच्या या
उत्तराचा निषेध केला.
देवस्थान समितीच्या सदस्यांनीही या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावत देवस्थान समितीकडून माहिती न घेताच तावडे यांनी सभागृहाची फसवणूक केल्याचा आरोप
केला.
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अहवालात मूर्तीची झीज झाल्याचं स्पष्ट असताना चुकीची माहिती दिल्याबद्दल विनोद तावडे यांनी आठ दिवसात माफी मागावी. माफी न
मागल्यास कोल्हापूर बंद ठेऊन स्वागत करू असा इशारा पुजारी हटाव समितीने केला.
तर, अंबाबाई मूर्तीच्या विषयी कोणत्याही प्रश्नावर माहिती घेऊनच बोलावे अशी मागणी देवस्थान समितीच्या सदस्यांनी केली.