जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुण्यात घेराव घालण्यात आला.
इथल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारतीय विज्ञान महोत्सवाच्या उद्धाटनासाठी ते आले होते.
त्यावेळी फीवाढीच्या मुद्द्यावरुन पालकांनी त्यांना घेराव घातला. गेल्या अनेक दिवसांपासून शालेय फीवाढीचा मुद्दा पुण्यात तापला.
त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घ्या अशी मागणी पालकांनी तावडेंकडे केली. यावेळी या प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासन तावडेंनी पालकांना दिले.
तसेच फी वाढ करणाऱ्या पुण्यातल्या 7 शाळांची सोमवारी सुनावणी घेणार असल्याचंही ते म्हणाले.