जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील मोठ्या शिक्षण संस्थांना बोर्डाचा दर्जा देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीय.
नाशकात शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेचा शतक महोत्सवी वर्षानिमित्त विनोद तावडे गेले असता त्यांनी या कार्यक्रमात हे वक्तव्य केलंय.
मोठ्या शिक्षण संस्थांना बार्डाचा दर्जा देणार असं वक्तव्य करताना तावडेंनी मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्था, रयत शिक्षण संस्था आणि विवेकानंद शिक्षण संस्था या 3 शैक्षणिक संस्थांचा उल्लेख केला.