जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य वक्फ मंडळाच्या नवीन अध्यक्षाची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले. सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नियमित बैठका होत नसल्याची लक्षवेधी उपस्थित केली होती.
यास उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते. राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरात लवकर अध्यक्षांची नियुक्ती होईल.