जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नारायण राणे यांच्या कुंडलीमध्ये सध्या मंत्रिपदाचा योग नसल्याचा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांच्या मंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे.
सध्या प्रस्तावित नाणार रिफायनरीबाबत 0भाजप अनुकूल असताना राणे या रिफायनरीच्या विरोधात आहेत. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता, राणे या रिफायनरीला विरोध करून मुख्यमंत्र्यांवर मंत्रीपदासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना मंत्रीपद मिळणार नाही. रिफायनरी प्रकल्पाची ढाल करून मंत्रिपद पदरात पाडण्याचा राणे यांचा प्रयत्न आहे असं खासदार विनायक राऊत म्हणाले.