Vinayak Raut: विनायक राऊतांच्या सुनेची थेट पोलिसांत धाव; मुलासह संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप

माजी खासदार विनायक राऊत, त्यांच्या कुटुंबीयांसह दोन तथाकथित बाबांविरोधात सुनेच्या तक्रारीनंतर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Vinayak Raut: विनायक राऊतांच्या सुनेची थेट पोलिसांत धाव; मुलासह संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे एक प्रकरण समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे कुटुंबीय आणि दोन तथाकथित बाबांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दाखल केला असून, त्यांनी मानसिक व शारीरिक छळासह अंधश्रद्धा आणि जादूटोण्याशी संबंधित गंभीर आरोप केले आहेत.

गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, पती, सासरे आणि इतर कुटुंबीयांकडून दीर्घकाळ छळ होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मूल होत नसल्याचे कारण देत त्यांना अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध विधींना सामोरे जाण्यास भाग पाडण्यात आले. यासाठी दोन तथाकथित बाबांची मदत घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: Pravin Darekar: ‘तुमची उंची आणि कुवत किती?’; प्रवीण दरेकरांचा बच्चू कडू यांच्यावर निशाणा

तक्रारीमध्ये फिरोज बाबा आणि काजी बाबा या दोघांचीही नावे नमूद करण्यात आली आहेत. संबंधित बाबांच्या सांगण्यावरून विविध अघोरी प्रकार करण्यात आले, असा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध डोक्यावरील केस कापण्यात आले आणि जबरदस्तीने गोमूत्र पाजण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच काळी जादू प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात तपास सुरू असून संबंधित सर्व आरोपांची पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात विनायक राऊत यांचे चुलत बंधू आबा राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधातही पुढील चौकशी सुरू असून तपासाच्या आधारे आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule: 2034 च्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ’14 कोटी जनतेची भावना…’

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोप हे तक्रारदार महिलेने केलेले असून त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. अद्याप न्यायालयाने कोणालाही दोषी ठरवलेले नाही.

पोलीस या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवत असून पुरावे, वैद्यकीय नोंदी आणि इतर बाबींचीही तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number