जखमी माकड दिसताच ग्रामस्थांनी केले असे काही

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर कोल्हापूरात जखमी माकडावर उपचार करुन त्याला जीवनदान दिल्याची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरच्या सांगव-लिंगनूर रस्त्यावर विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने हे माकड भयंकर जखमी झाले होते. हे माकड जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पशुवैद्याच्या मदतीने त्याच्यावर उपचार करुन त्याचा जीव वाचवला.   काही दिवसांपूर्वी वाशिममध्ये एका माकडाला अमानुषपणे मारहाण […]

जखमी माकड दिसताच ग्रामस्थांनी केले असे काही

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर


कोल्हापूरात जखमी माकडावर उपचार करुन त्याला जीवनदान दिल्याची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरच्या सांगव-लिंगनूर रस्त्यावर विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने हे माकड भयंकर जखमी झाले होते. हे माकड जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पशुवैद्याच्या मदतीने त्याच्यावर उपचार करुन त्याचा जीव वाचवला.

 

काही दिवसांपूर्वी वाशिममध्ये एका माकडाला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत तिघेजणं माकडाला उलटे लटकवून बेदम मारत असल्याचे दिसले. त्यामुळेच एकीकडे अमानुष मारहाण तर, दुसरीकडे मुक प्राण्याला जीवनदान दिल्याची घटना. त्यामुळे आजही माणुसकीचे मोठे उदाहरण पाहायला मिळतयं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number