जय महाराष्ट्र न्यूज, राजापूर
राजापूर नाणारमधील रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पविरोधातील आंदोलनाचा आज सलग पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशीही ग्रामस्थांनी विरोध करत मोजणी बंद पाडली. कात्रादेवी, पाळेकर वाडी, दत्तवाड, डोंगर इथल्या ग्रामस्थांनी आपल्या जमिनीत झाडाखाली तंबू ठोकले आणि तिथंच ठिय्या मांडल्या.
राजापुर नाणार गावात केंद्र शासनाच्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांचा संयुक्त रिफायनरी प्रकल्प होणार आहे. मात्र, हा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्पासारखाचं असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे हा प्रकल्प हद्दपार व्हावा, यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आलेत.