सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैभव असलेल्या विजयदुर्गला वाचवा

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग   सिंधूदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झालाय. पण, इथल्या ऐतिहासिक वारशांचं जतन होताना दिसत नाही. इथल्या तीन बाजू समुद्राने वेढलेल्या विजयदुर्गाची तर मोठ्या प्रमाणावर पडझड झालीय. पूर्वेकडील जिब्राल्टर अशी ओळख असलेला हा किल्ला अजिंक्य किल्ला होता. या किल्ल्याच्या पायथ्याशी लाटा धडकत असल्यानं आता याच्या तटबंदीची पडझड झालीय. चार वर्षांपूर्वी विजयदुर्गचा […]

सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैभव असलेल्या विजयदुर्गला वाचवा

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

सिंधूदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झालाय. पण, इथल्या ऐतिहासिक वारशांचं जतन होताना दिसत नाही. इथल्या तीन बाजू समुद्राने वेढलेल्या विजयदुर्गाची तर मोठ्या प्रमाणावर पडझड झालीय.

पूर्वेकडील जिब्राल्टर अशी ओळख असलेला हा किल्ला अजिंक्य किल्ला होता. या किल्ल्याच्या पायथ्याशी लाटा धडकत असल्यानं आता याच्या तटबंदीची पडझड झालीय.

चार वर्षांपूर्वी विजयदुर्गचा एक भाग कोसळला होता, त्यावर थोडा फार निधी खर्च करून पडलेला भाग बांधण्यात आला होता. मात्र, शासन गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप ग्रामस्थ करीत आहे..

विजय दुर्गा सारखा दुसरा जल दुर्ग नाही. जवळपास 17 एकर परिसर विजय दुर्गाने व्यापला आहे.  एक अशीही माहिती मिळतेय  की शिवाजी महाराजांनी स्वतः भगवा फडकावला असे दोनच किल्ले एक तोरणा आणि दुसरा विजयदुर्ग.

विजय दुर्गाचं वैशिष्ट्य असं होत कि ह्या परिसरात उभी असलेली मराठ्यांची आरमारी जहाजं  दुरून अरबी समुद्रातुन दिसत नसत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number