जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सहा जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली असली तरी, रहाटकर माघार घेणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र, रहाटकर यांना भाजपाने नेमके कशासाठी उभे केले? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
सहा जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली असली तरी, रहाटकर माघार घेणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र, रहाटकर यांना भाजपाने नेमके कशासाठी उभे केले? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.