Homeमहाराष्ट्र कर्जबुडव्या विजय मल्ल्याला 10 जुलैला कोर्टात राहण्याचे आदेश
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला 10 जुलैला कोर्टात राहण्याचे आदेश
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं दणका दिला आहे. मल्ल्याला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. कोर्टाने विजय मल्ल्याला 10 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेशही दिले आहे. 10 जुलैला शिक्षेची सुनावणी होईल. डीएगो डिलमुळे जे पैसे मिळाले, ते सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा […]
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं दणका दिला आहे. मल्ल्याला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरवण्यात आलं आहे.
कोर्टाने विजय मल्ल्याला 10 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेशही दिले आहे. 10 जुलैला शिक्षेची सुनावणी होईल. डीएगो डिलमुळे जे पैसे मिळाले, ते सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करुन घ्यावे, अशी मागणी बँकांनी कोर्टाकडे केली आहे.