काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार असून अद्याप निवडणुकांची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात असताना निवडणुका 10-13 ऑक्टोबरला पार पडणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच सप्टेंबरच्या 10-15 तारखेला आचारसंहिता लागू होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यातच असून निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विधानसभा निवडणुकाबाबत चर्चा केली.
ऑक्टोबरच्या 10-13 तारखेपर्यंत विधानसभा निवडणुका असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
तसेच सप्टेंबरच्या 10-15 तारखेपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
यापूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑक्टबरच्या 15-20 तारखेपर्यंत निवडणुका होणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती.