विधानसभा निडणुकीसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या पार्श्वभुमीवर आता अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या छाननीमध्ये मुंबईत 36 विधानसभा मतदार संघांसाठीची अर्जांची पडताळणी अधिकाऱ्यांकडून शनिवारी करण्यात आली. यात एकूण 75 अर्ज बाद ठरवण्यात आले.
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना या पार्श्वभुमीवर आता अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान मुंबईत 36 विधानसभा मतदार संघांसाठी उमेदवारांनी केलेल्या अर्जांची अधिकाऱ्यांकडून शनिवारी पडताळणी केली गेली.
मुंबई आणि उपनगरातून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 442 मेदवारांनी अर्ज केले होते. यामध्ये मुंबईतून 107 उमेदवारांनी तर उपनगरातून 335 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात मुंबई आणि उपनगरातून एकूण 75 अर्ज बाद ठरवण्यात आले. तर 367 उमेदवारी अर्ज निवडणूकीसाठी पात्र ठरले आहेत.
उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची शनिवारी पडताळणी करण्यात आली. तसेच पात्र ठरलेल्या उमेदवारांना 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.