सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकरूख उपसा सिंचन योजनेतून उजनीचे पाणी मिळण्यासाठी 12 गावातील लोकांनी येत्या विधानसभा मतदार संघावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अक्कलकोट तालुक्यातील कुंभारी ,शीरपणहळ्ळी दोड्डी ,यत्नाळ येथील भागातील शेतकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील १२ गावातील शेतकरी गेल्या २५ ते ३० वर्षापासून उजनीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत ,मात्र त्यांच्यापर्यंत उजनीचे पाणी काही पोहचले नाही ,ऐन पावसाळ्यात सुद्धा या परिसरातील गावामध्ये शेतीसाठी पाणी मिळत नाही. अशी अवस्था झाली आहे.
उजनी धरणातून पाणी सोडले जाते मात्र ते पाणी काहीच शहरापर्यंतच पोहचते, या भागातील लोकांना पाणी देण्यासाठी एकरूख सिंचन योजना जाहीर करण्यात आली. मात्र ते काम अद्याप ही रखडलेले आहे. त्यामुळे ही योजना कार्यांवित केली असती तर शेतीसाठीही लोकांना पाणी उपलब्ध झाले असते मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.