जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नाणार प्रकल्पाच्या चर्चेवर पडदा टाकण्यासाठी भाजप सरकारकडून मुंबईचा विकास आराखडा जाहीर करण्यात आलाय असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय.
तसेच, विधानपरिषदेच्या 6 जागांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढण्याच्या विचारात आहोत. तर, येत्या 29 एप्रिल रोजी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी माझ्याऐवजी नवीन नेत्याची निवड करण्यात यावी
अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केले असल्याचे ही सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.