मुंबई, २९ जून २०२३, प्रतिनिधी : सध्या सिनेसृष्टीतील बरेच कलाकार परदेश वारीवर आहेत. आपल्या या खास दौऱ्याची अनेक कलाकार समाज माध्यमांवर खास तपशील ही देताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ हे जोडपं देखील आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून न्यूयॉर्कला गेले आहेत. यावेळचा या दोघांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालाय.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफ हे दोघे न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवत आहेत.यावेळी त्याचन्ह एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडिओत ते दोघेही न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये वेळ घालवताना दिसत आहेत. या व्हिडिओत त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र देखील दिसत आहेत.
सोमवारी कतरिनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सुट्टीचे काही फोटो सामायिक केलेत. या फोटोंमध्ये कतरिनाने निळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केलाय. ती विना मेकअप लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.