IND vs NZ T20 World Cup: भारत-न्यूझीलंड फायनलआधी चाहत्यांना धक्का; स्टार खेळाडूच्या 15 वर्षांच्या कारकीर्दीला ब्रेक

आज रविवार 8 मार्चला टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. एका स्टार क्रिकेटरबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

IND vs NZ T20 World Cup: भारत-न्यूझीलंड फायनलआधी चाहत्यांना धक्का; स्टार खेळाडूच्या 15 वर्षांच्या कारकीर्दीला ब्रेक

आज रविवार 8 मार्चला टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा हायवोल्टेज सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता लढवला जाणार आहे. आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाला लाखो चाहत्यांसमोर मायदेशी इतिहास रचण्याची संधी आहे. यादरम्यान दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले असून टीम इंडियातील खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे साऱ्या देशाचं आणि क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. यावेळी भारत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज असली तरी दुसरीकडे न्यूझीलंडचा हा पहिलीवहिली टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान अहमदाबादच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे.

हेही वाचा- IND vs NZ T20 World Cup: वर्ल्ड कप ट्रॉफीपासून एक पाऊल दूर, चिंता वाढली; पण 'त्या' 3 अडथळ्यांचं पुन्हा टीम इंडियासमोर आव्हान
अशातच एका स्टार क्रिकेटरने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहेत न्यूझीलंडची अनुभवी महिला क्रिकेटपटू आणि गोलंदाज ली टाहुहू हीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून याबाबतची अधिकृत माहिती आयसीसीने एक्सवर पोस्टद्वारे शेअर केली आहे. यावेळी पोस्टमध्ये असं म्हटलं की, ली ताहुहूने तिच्या 15 वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीला निवृत्ती जाहीर केली आहे. कॅन्टरबरीच्या या वेगवान गोलंदाजाने 103 एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे आणि 125 विकेट्ससह व्हाईट फर्न्सची सर्वकालीन आघाडीची एकदिवसीय विकेट्स घेणारी गोलंदाज म्हणून या फॉरमॅटमधून बाहेर पडली आहे. 
2011 साली 20 वर्षाच्या ली टाहुहू हीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून न्यूझीलंडकडून तिने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळले असून 125 विकेट्स मिळवल्या. ली टाहुहू हीने 2021 साली कॅन्सवर मात करत यशस्वी कमबॅक केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत ली टाहुहू हीने न्यूझीलंडसाठी अनेक सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली असून न्यूझीलंडला अनेकदा एकहाती सामने जिंकून देण्यात योगदान दिलं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number