Vijaya Mehta : मराठी रंगभूमी पोरकी झाली…, अनेक दिग्गजांना घडवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचे निधन

मराठी कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं वयाच्या 92 वर्षी निधन झालं आहे.

Vijaya Mehta : मराठी रंगभूमी पोरकी झाली…, अनेक दिग्गजांना घडवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचे निधन

मराठी कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं वयाच्या 92 वर्षी निधन झालं आहे. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. विजया मेहता या या आधुनिक मराठी रंगभूमीवरील एक अत्यंत मानाच्या अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मात्या होत्या. त्यांनी अनेक नाटकं आणि अनेक चित्रपटात काम केले आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले अशा दिग्गज कलाकारांच्या यशामागे त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा- Hera Pheri 3: हेरा फेरी 3 अधिकच संकटात! निर्मात्यानंतर आता दिग्दर्शकानेही फिरवली पाठ; म्हणाले, 'कोणताही संबंध…

विजया मेहता यांची कलाविश्वातील कारकीर्द
विजया जयवंत असं विजया मेहता यांच खरं नाव असून त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी गुजरातच्या बडोदा येथे झाला होता. समांतर सिनेमा आणि नाट्य चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली त्यानंतर त्यांनी दिल्लीत इब्राहिम अल्काझी आणि आदी मर्झबान यांच्याकडे नाट्यकलेचे शिक्षण घेतले. 1960 च्या दशकात मराठी प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीवर त्यांनी आपली छाप पाडली. मराठी रंगभूमीत त्यांना ‘बाई’ असे संबोधले जायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाटकाच्या मुशीतून नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, अशोक सराफ यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार घडले. विजयाबाईंना रंगभूमीवर कडक शिस्तीसाठी ओळखल्या जायच्या. त्यांना 1975 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिग्दर्शनातील उत्कृष्टतेसाठी प्रदान करण्यात आला होता. त्याचसोबत 1986 मध्ये ‘राव साहेब’ भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

हेही वाचा- Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: श्रद्धा कपूरचा 'ईठा' वादात! कुटुंबियांनी केली मोठी मागणी, 'या' कृतीवर नोंदवला तीव्र आक्षेप

विजया मेहता यांची गाजलेली नाटकं आणि चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्र
एक शून्य बाजीराव’  हे  सी. टी. खानोलकर लिखित नाटक  भारतीय रंगभूमीवरील एक मैलाचा दगड मानले जाते.  बॅरिस्टर, शाकुंतल, हमीदाबाईची कोठी, वाडा चिरेबंदी, पुरुष, हयवदन. विजयाबाईंनी 'झिम्मा' झिम्मा आठवणींचा गोफ हे आपले आत्मचरित्र लिहिलं होतं. नाटककार विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या नाट्यगटात काम केले. अजब न्याय वर्तुळाचा: जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या 'द कॉकेशियन चॉक सर्कल' या नाटकाचे त्यांनी मराठी रूपांतर केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेली 'स्मृतिचित्रे' ही दूरचित्रवाणी मालिका आणि 'लाइफलाइन' ही मालिका अत्यंत गाजली. इतकचं नव्हे तर 1986 साली 'रावसाहेब', 1988 साली 'पेस्तनजी' या चित्रपटांचे दिग्दर्शन करत त्यांनी 1984 साली 'पार्टी' आणि 1981 साली 'कलियुग' या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने रंगभूमी पोरकी झाल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number