मुंबईत भाज्यांची विक्रमी आवक; दर उतरण्याची शक्यता !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गेल्या कित्येक दिवसांपासून भाज्यांच्या भावात कमालीची वाढ झाली होती. भाज्याच्या भाववाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव काही प्रमाणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई, मुंबई उपनगराला नवी मुंबईतील एपीएमसी बाजारातून भाजीपुरवठा […]

मुंबईत भाज्यांची विक्रमी आवक; दर उतरण्याची शक्यता !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या कित्येक दिवसांपासून भाज्यांच्या भावात कमालीची वाढ झाली होती. भाज्याच्या भाववाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव काही प्रमाणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, नवी मुंबई, मुंबई उपनगराला नवी मुंबईतील एपीएमसी बाजारातून भाजीपुरवठा होत असतो. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत आज भाजीपाल्याची विक्रमी आवक झाल्याची नोंद करण्यात आली. या बाजारपेठेत दररोज सरासरी 500 ते 550  गाड्यांची आवक होत असते. मात्र आज या गाड्यांची आवक 850 गाड्यांवर पोहचली असून विक्रम नोंदवला गेला आहे.   

 

बाजारपेठेत दररोज गणेशोत्सव, पाऊस आणि सुट्ट्यांमुळे आज शेतकऱ्यांनी शेतातला शेतमाल बाजारात पाठवल्याने आवक वाढली आहे. वर्षभरातली अश्या पद्धतीने विक्रमी आवक नोंदवण्याची ही दुसरीच वेळ आहे.

 

भाज्यांची विक्रमी आवक झाल्यामुळे भाज्यांचे भाव 30 टक्क्यांनी घसरले आहेत. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number