इंधन दरवाढीचा फटका भाज्यांनाही

दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंधन दरवाढीचा फटका आता भाज्यांना देखील बसलेला पाहायला मिळतोय. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे भाज्यांच्या आयात आणि निर्यातीवर याचा परिणाम दिसुन येत आहे. त्यामुळे इतर दिवशी मिळणाऱ्या भाज्यांचा दर १५ ते २० रुपयांनी वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांना आणि गृहिणींना याची झळ सोसावी लागत आहे. कोरोना काळात लादलेले निर्बंध आणि टाळेबंदीमध्ये सर्व सामान्यांच्या हाताला […]

इंधन दरवाढीचा फटका भाज्यांनाही

दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंधन दरवाढीचा फटका आता भाज्यांना देखील बसलेला पाहायला मिळतोय. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे भाज्यांच्या आयात आणि निर्यातीवर याचा परिणाम दिसुन येत आहे. त्यामुळे इतर दिवशी मिळणाऱ्या भाज्यांचा दर १५ ते २० रुपयांनी वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांना आणि गृहिणींना याची झळ सोसावी लागत आहे. कोरोना काळात लादलेले निर्बंध आणि टाळेबंदीमध्ये सर्व सामान्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे पुरेसा पैसा देखील नसल्याने नागरिकांना वाढत्या महागाईला सामोर जावं लागतं असल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

 

फरसबी -आधी  ३०रुपये – आता   ४०रुपये
घेवडा -आधी    २०रुपये – आता   ३०रुपये
चवळी -आधी   २०रुपये – आता   ३०रुपये
कोबी -आधी    ३०रुपये – आता    ४०रुपये
कारली -आधी  ४०रुपये – आता   ६०रुपये
शिमला -आधी  ४०रुपये – आता   ६०रुपये

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number