जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
आज सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा साजरी केली असताना औरंगाबादमध्ये मात्र वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येपासून पत्नी पीडीत संघटनेने पिंपळ पोर्णिमा साजरी केली.
या पत्नी पीडितांनी पुढच्या जन्मी ही पत्नी नको म्हणून पिंपळाच्या झाडाला दोरा बांधून, पुढच्या जन्मी काय भविष्यातील सात जन्मी ही पत्नी नको अशीही यम रामाजाला प्रार्थना केली.
आज वट सावित्री पौर्णिमे रोजी जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी पत्नी वडाच्या झाडाला दोरा बांधून प्रदक्षिणा घालते. मात्र त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याआधी आमची इच्छा पूर्ण कर म्हणून एक दिवस आधी पत्नी पिडीत पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची पूजा केली.
वाळूज परिसरात पत्नी पिडीत संघटनेने हे आंदोलन केले. सर्वच ठिकाणी महिलांचे कायदे आहेत. मात्र काही वेळा या कायद्यांचा आधार घेत पुरुषांवर अन्याय केला जातो. अश्याच काही पिडीत पुरुषांनी हे आंदोलन केले.
पिंपळाच्या झाडाला पुरुष हक्कासाठीच्या मागण्या देखील लावण्यात आल्या आहेत. आजही ठिकठिकाणी पत्नी पीडितांनी पिंपळाच्या झाडाची पूजा करून फेऱ्या माराव्यात असं आवाहन या पत्नीपीडितांनी केलं आहे.