वृत्तसंस्था, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशमधल्या बांदा जिल्ह्यातील माणिकपूर रेल्वे स्टेशनवर 13 डब्यांची वास्को द गामा-पटना एक्स्प्रेस रुळावरून घसरलीय. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर आठहून अधिक जण जखमी आहेत.
रेल्वे रूळ तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी वर्तवलाय. तर दुसरीकडे ट्रेन चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाल्याचीही चर्चा झालीय.
पटना- गोवा रेल्वे मार्गावर अपघात झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला असून, इतर ट्रेनचं वेळापत्रकही बदलण्यात आलंय.
बचावकार्याचं पथक आणि डॉक्टर्स घटनास्थळी दाखल झाले असून, रेल्वेनं हेल्पलाइनही सुरू केलीय. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.