जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नववीतल्या चार मुलांना मुख्यध्यापकांनी पट्ट्यानं बेदम मारहाण केली आहे. नालासोपाऱ्यातील एसकेसी इंग्लिश शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे.
या घटनेनंतर चारही विद्यार्थी हादरून गेले असून पालक संतप्त आहेत. महत्त्वाचं म्हणजे याबाबत पोलिसात तक्रार केल्यास मुलाल शाळेतून काढून टाकू, अशी धमकी या प्राध्यापकानं दिली.
या घटनेनंतर तुळींज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.