जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
वधू-वरांच्या रेशीमगाठी बांधण्यासाठी मंगलाष्टका म्हणण्याचे काम सुरू होते. तर, दुसरीकडे वऱ्हाड्यांना झोडपून काढण्याचा प्रकार ऐन लग्न मंडपात घडला.
बार्शी तालुक्यातील पिंपळगाव येथे बुधवारी हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारात सात ते आठजण जखमी झाले असून एकाची प्रक्रती चिंताजनक आहे.
लग्नाच्या वरातीत मुलांचे नाचण्याप्रसंगी झालेल्या भांडणामुळे हा प्रकार घडला. या प्रकाराने वधू-वरांना विवाहानंतर एकत्रपणे जेवण करण्याऐवजी दवाखाना गाठण्याची वेळ आली.