मुंबई, १५ जून २०२३, प्रतिनिधी : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयासह तिच्या सुदृढ जीवनशैलीचे देखील लाखो चाहते आहेत. मध्यंतरी शिल्पा तिच्या पतीमुले चर्चेत होती. दरम्यान आता बिग बाॅस ओटीटीमध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा सहभागी होणारी असल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहेत अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.,
ही घटना गेल्या आठवड्यात घडली. याविषयी शिल्पा ने पोलिसात तक्रार नोंदवली होती. हे प्रकरण बराच काळ गुलदस्त्यात ठेव्ब्यात आली होती. परंतु आता याबात अधिकृत माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
शलपणे दाखल केलेल्या तक्रारीत तिच्या घरात चोरी झाली असून काही मौल्यवान वस्तू गायब असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.