जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफी आता फॅशन झाली आहे असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी मुंबईत केले.
परिस्थिती अतिशय बिकट असेल, तरच कर्जमाफी द्यायला हवी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही.
कर्जमाफी म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे असे विधान व्यंकय्या नायडूंनी एका कार्यक्रमात केले.
बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीकासुद्धा त्यांनी केली.
त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी चांगलाच समाचार घेतला आहे.
कर्जमाफीला फॅशन म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचा अपमान असल्याचं मत रावतेंनी व्यक्त केले.