वैभववाडी- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्यांचे साम्राज्य

तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारां राष्ट्रीय महामार्ग वैभववाडी- करूळ ते कोल्हापूर या महामार्गाला खड्ड्यांनी वेढलय. तळ कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. तळ कोकणाला जीवनावश्यक वस्तू दूध, भाजीपाला, कडधान्य, गॅस ,डिझेल पेट्रोल आणि सीएमजी सह अन्य वाहतूक या राष्ट्रीय महामार्गाने होते. सध्या हा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे. मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र […]

वैभववाडी- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्यांचे साम्राज्य

तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारां राष्ट्रीय महामार्ग वैभववाडी- करूळ ते कोल्हापूर या महामार्गाला खड्ड्यांनी वेढलय. तळ कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. तळ कोकणाला जीवनावश्यक वस्तू दूध, भाजीपाला, कडधान्य, गॅस ,डिझेल पेट्रोल आणि सीएमजी सह अन्य वाहतूक या राष्ट्रीय महामार्गाने होते. सध्या हा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे. मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणाला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य बनले आहे. त्यामुळे या महामार्गावर खड्यांचा साम्राज्य आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी या महामार्गावरून नागरिकांची वर्दळ असते. खड्यांनीं व्यापलेल्या या रस्त्यावरून येताजातानी वाहनधारकांची तारांबळ उडते. वाहनधारकांना तारेवरची कसरत करत हा रास्ता पार करावा लागतो, तर या सगळ्यात पादचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

घाटाच्या पायथ्या पासून संपूर्ण रस्त्याची चाळन झाली असून वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे या खड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांची दमछाक होतेय. हा राष्ट्रीय महामार्ग सुरळीत व्हावा अशी मागणी वाहनचाकांमधून जोर घेत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number