श्रीलंकेत सुरू असलेल्या त्रिकोणीय मालिकेतील चौथा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सामन्यात, तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील 'इंडिया ए' संघाचा 'श्रीलंका ए' संघाने 'सुपर ओव्हर'मध्ये पराभव केला. वैभव सूर्यवंशीला फलंदाजीमध्ये विशेष छाप पाडता आली नाही, मात्र श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत झालेल्या वादामुळे तो चर्चेत आला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाला केवळ ९ धावा करता आल्या. सुपर ओव्हर संपल्यानंतर अशी माहिती समोर आली की, श्रीलंकेच्या एका खेळाडूने वैभवला काहीतरी बोलले होते, ज्यामुळे तो १५ वर्षीय खेळाडू संतापला. या घटनेचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.
समोर आलेल्या माहितीनुसार, 'सुपर ओव्हर' संपल्यानंतर श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू विशेन हलांबागे याने वैभव सूर्यवंशीला "सामना संपला आहे, आता घरी जा," असे म्हटले. यावरून संतापलेल्या वैभव सूर्यवंशीने त्या श्रीलंकन खेळाडूला जाब विचारला आणि परिस्थिती इतकी चिघळली की अखेरीस दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मैदानावर त्याने केलेल्या कृतीनंतर त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठी त्याच्यावर बंदी घालण्याचा विचार होऊ शकतो आणि त्याला खेळण्याची संधी मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खेळाडू म्हणून हे वर्तन अत्यंत चुकीचं होतं. सुपर ओव्हरमधील पराभवानंतर वैभव मैदानातच श्रीलंकेच्या खेळाडूशी धक्काबुकी आणि मारामारी करताना दिसला. या गैरवर्तनामुळे आता त्याच्यावर आयसीसीकडून कडक कारवाई आणि बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.