Syed Mushtaq Ali T20 : वैभव सूर्यवंशीची आग ओकणारी खेळी व्यर्थ! पृथ्वी शॉच्या चमकदार खेळीने महाराष्ट्राला दिला शानदार विजय

सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेच्या चौथ्या समान्यात वैभव सूर्यवंशीने 108 धावांची नाबाद खेळी केली. मात्र यावर प्रत्युत्तर देत पृथ्वी शॉच्या महाराष्ट्र संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला.

Syed Mushtaq Ali T20 : वैभव सूर्यवंशीची आग ओकणारी खेळी व्यर्थ! पृथ्वी शॉच्या चमकदार खेळीने महाराष्ट्राला दिला शानदार विजय

सध्या क्रिकेटविश्वात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं नाव चांगलच गाजत आहे. नुकताच कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडलेला सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चमकली आहे. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेच्या चौथ्या समान्यात बिहार आणि महाराष्ट्र आमनेसामने आले. यावेळी वैभव सूर्यवंशी खास आकर्षण ठरला.

त्याने 61 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांसह 108 धावांची नाबाद खेळी केली. यावेळी त्याने षटकार मारत शतक पूर्ण केले. वैभव सूर्यवंशी त्याच्या गेल्या काही दिवसांच्या फॉर्ममुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल होत होता. त्याने सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेतील सलग तीन सामन्यात खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड पडत होती. तसेच त्याच्या खेळीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते.

हेही वाचा- IPL 2026 Mini Auction: आईपीएल 2026 मिनी लिलावासाठी 1,355 खेळाडूंची नोंदणी; 45 जण 2 कोटींच्या यादीत

मात्र चौथ्या सामन्यात त्याने या सर्व प्रश्नावर त्याच्या तुफानी खेळीने प्रत्युत्तर दिल आहे. सूर्यवंशीच्या शतकामुळे बिहारने 20 षटकात 3 गडी बाद 176 धावा केल्या. मात्र यावर प्रत्युत्तर देत पृथ्वी शॉच्या महाराष्ट्र संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. शॉने 30 चेंडूत 11 चौकार आणि एक षटकार मारत 66 धावा केल्या. ज्यामुळे पृथ्वी शॉच्या महाराष्ट्र संघाने शेवटच्या षटकात पाच चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

पृथ्वी शॉच्या या प्रयत्नांमुळे त्याला यंदांच्या आयपीएलमध्ये संधी दिली जाऊ शकते. पृथ्वी शॉ आयपीएल 2025च्या मेगा लिलावात विकला गेला नसल्यामुळे आयपीएल 2025 मध्ये खेळू शकला नाही. मात्र आता त्याच्यातील सुधारणा पाहायचं झाल तर, त्याने त्याच्या फिटनेससह खेळावरही लक्ष्य केंद्रीत केलं आहे. पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. या वर्षी तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे सध्या स्थिती पाहता त्याला आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात अनेक संघाकडून विकत घेतले जाऊ शकते. 

हेही वाचा- ILT20 2025-26 Live Streaming: ILT20 चा चौथा हंगाम आजपासून सुरू; भारतात सामने कुठे आणि कसे पाहाल? जाणून घ्या

तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने 2026 च्या आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशीला कायम ठेवले आहे. 2025 च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number