Vaibhav Sooryavanshi Viral Video: ‘फोटो काढायचा असेल तर पैसे द्या…’ वैभव सूर्यवंशीची फॅन्सकडे अजब मागणी; चाहता म्हणाला, ‘2 फोटोचे 200 रुपये…’

राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीने दोन लहान चाहत्यांसोबत फोटोसाठी 100 रुपये मागत मस्करी केली.

Vaibhav Sooryavanshi Viral Video: ‘फोटो काढायचा असेल तर पैसे द्या…’ वैभव सूर्यवंशीची फॅन्सकडे अजब मागणी; चाहता म्हणाला, ‘2 फोटोचे 200 रुपये…’

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी हा राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार सध्या मैदानातील धडाकेबाज फलंदाजीसोबतच मैदानाबाहेरील मजेशीर स्वभावामुळेही चर्चेत आला आहे. अवघ्या 15 वर्षीय या खेळाडूने दोन लहान चाहत्यांसोबत केलेली हलकीफुलकी मस्करी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल 2026 मधील पुढील सामन्यासाठी जयपूरहून चंदीगडला रवाना होत होता. पंजाब किंग्जविरुद्ध 28 एप्रिल रोजी सामना होणार असल्याने संघ विमानतळावर पोहोचला होता. त्याचवेळी काही चाहते खेळाडूंना भेटण्यासाठी आले होते. यामध्ये दोन लहान मुलांनी वैभव सूर्यवंशीसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी वैभवने त्यांच्याशी मजेशीर अंदाजात संवाद साधला. “एका फोटोचे 100 रुपये लागतील,” असे तो म्हणाला. हे ऐकताच त्या मुलांना काही क्षण काय बोलावे हेच सुचले नाही. त्यानंतर एका मुलाने दोन फोटोसाठी 200 रुपये देतो, असेही म्हटल्याचे दिसते. काही क्षणांसाठी दोघेही गोंधळून गेले.

मात्र लगेचच वैभवने ही केवळ मस्करी असल्याचे सांगितले आणि स्वतः हसत त्या दोन्ही चाहत्यांसोबत फोटो काढले. हा प्रसंग पाहून आजूबाजूचे लोकही हसू लागले. चाहत्यांसोबतचा हा साधा पण गोड संवाद अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

राजस्थान रॉयल्सने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. त्यानंतर काही तासांतच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. क्रिकेट चाहत्यांनी वैभवच्या साधेपणाचे आणि विनोदी स्वभावाचे कौतुक केले.

अनेकांनी सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी “वैभवचे चाहते त्याच्यापेक्षाही लहान आहेत,” असे म्हटले. तर काहींनी त्याला “छोटा बिझनेसमन” अशीही गंमतीशीर उपाधी दिली. काहींनी हा प्रसंग “खूपच wholesome” असल्याचे म्हटले.

वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तो राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. अलीकडेच त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केवळ 36 चेंडूत शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याआधी गुजरात टायटन्सविरुद्धही त्याने तुफानी शतक ठोकले होते.

अवघ्या कमी वयात मिळालेल्या यशानंतरही वैभवचा साधेपणा कायम असल्याचे या व्हिडिओतून दिसून आले. मैदानावर तडाखेबाज खेळ आणि मैदानाबाहेर निरागस मस्करी यामुळे तो आता चाहत्यांचा लाडका बनला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number