वृत्तसंस्था, नवी दिल्ली गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी हे विजयी झालेत. दलित हक्क कार्यकर्ते मेवाणी यांनी 18 हजार 150 मतांनी विजय मिळवलाय. वडगाम मतदारसंघात मेवाणी यांच्यासह एकूण दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, खरी लढत मेवाणी आणि भाजपचे चक्रवर्ती यांच्यातच होती. मेवाणींना काँग्रेसने पाठिंबा दिला होता.