विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. तर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली होती. मात्र, आमदारांच्या संख्याबळाची संख्या पाहता हे पद काँग्रेसकडे गेले. काँग्रेसने प्रदीर्घ खल […]

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. तर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली होती. मात्र, आमदारांच्या संख्याबळाची संख्या पाहता हे पद काँग्रेसकडे गेले. काँग्रेसने प्रदीर्घ खल केल्यानंतर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वडेट्टीवार यांच्या रुपात राज्याला विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार यावरती शिक्कामोर्तब झालं. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी 30 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीमध्ये पाठवलं. त्यामुळे आमदारांच समर्थन लक्षात घ्यायच की आणखी काही निर्णय घ्यायचा हा प्रश्न निर्माण होता. परंतु अखेर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number