पुण्यात लवकरच घरोघरी लसीकरण

पुणे : राज्यात घरोघरी लसीकरणाची सुरुवात पुण्यातून होणार असल्याची माहिती बुधवारी राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आली . त्यासाठी एक खास वेबसाईट तयार करण्यात येणार असून त्याद्वारे इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जातील. लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण मोहीमेस सुरुवात करणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे. घरोघरी लसीकरण करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुण्यापासून प्रायोगित तत्वावर […]

पुण्यात लवकरच घरोघरी लसीकरण

पुणे : राज्यात घरोघरी लसीकरणाची सुरुवात पुण्यातून होणार असल्याची माहिती बुधवारी राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आली . त्यासाठी एक खास वेबसाईट तयार करण्यात येणार असून त्याद्वारे इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जातील. लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण मोहीमेस सुरुवात करणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे. घरोघरी लसीकरण करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुण्यापासून प्रायोगित तत्वावर सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं आहे.त्याच प्रमाणे केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही असंही राज्य सरकारने म्हंटल आहे.

राज्यात लसींचा पुरेसा पुरवठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहिमेचा वेग वाढला आहे. लसीकरण केंद्रावर येणे शक्य नसलेल्या ६० वर्षांवरील किंवा अपंग नागरिकांचे ,अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करण्यात आली आहे . या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या समोर ही सुनावणी करण्यात आली . आता घरोघरी जाऊन लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्य सरकारने बुधवारी मुंबई हायकोर्टात आपण केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचं सांगितलं आहे. केंद्राच्या परवानगीशिवाय घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात करणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number