जन्मानंतर अवघ्या 6 मिनिटांत आधारकार्ड मिळवून चिमुरडीने केला नवा विक्रम

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद भावना संतोष जाधव या चिमुरडीने भारतात एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. जन्मानंतर अखेर 6 मिनिटांतच तिला आधारकार्ड मिळाले आहे. उस्मानाबाद स्त्री रूग्णालयात भावनाचा रविवारी दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी जन्म झाला.   त्यानंतर 12 वाजून 9 मिनिटांनी तिला आधार क्रमांक मिळाला. जन्म झाल्यानंतर बालरोग तज्ञ् डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करुन तिची तब्येत ठीक […]

जन्मानंतर अवघ्या 6 मिनिटांत आधारकार्ड मिळवून चिमुरडीने केला नवा विक्रम

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद

भावना संतोष जाधव या चिमुरडीने भारतात एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. जन्मानंतर अखेर 6 मिनिटांतच तिला आधारकार्ड मिळाले आहे. उस्मानाबाद स्त्री रूग्णालयात भावनाचा रविवारी दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी जन्म झाला.

 

त्यानंतर 12 वाजून 9 मिनिटांनी तिला आधार क्रमांक मिळाला. जन्म झाल्यानंतर बालरोग तज्ञ् डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करुन तिची तब्येत ठीक असल्याचे स्पष्ट केले. यानंतर 12 वाजून 9 मिनिटांनी आधार नोंदणी मशीनवर फोटो काढून तिची नोंदणी करण्यात आली. नोंदणीसाठी तिच्या वडिलांचा आधार नंबर वापरण्यात आला. 

भावनाच्या आई-वडिलांनी सजगता दाखवल्यामुळे हे शक्य झाले. भावनाच्या आई वडिलांनी तिच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. त्यानंतर त्यांना तिचा जन्माचा ऑनलाईन दाखला आणि आधार नंबर मिळाला. यूआयडीएआय तर्फे तातडीने तिच्या जन्माची नोंद करण्यात आली आणि जन्म झाल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात आधार कार्ड मिळवण्याचा नवा रेकॉर्ड या चिमुकलीने केला आहे. जन्मल्यानंतर सर्वात कमी वेळेत तिला आधार कार्डच्या रूपाने भारतीय नागरिक असल्याची ओळख मिळाली आहे.

 

यापूर्वी मध्यप्रदेश येथील राखी या मुलीच्या जन्मानंतर तिला २२ मिनिटांत आधार मिळाले होते मात्र हा रेकॉर्ड उस्मानाबाद स्त्री रुग्णालयात जन्म घेतलेल्या भावनाने मोडला आहे.

 

भावनाला जन्मल्यानंतर लगेचच आधार व जन्माचा दाखल मिळाला. गेल्या 1 वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात जन्मतः आधार व लहान बालकांचा जन्मोत्स्व हे उपक्रम राबविले जात आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number