वापरा घरगुती ‘टोनर’

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या त्वचेकडे आपले नेहमी दुर्लक्ष होत असते. आपल्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा तेल साचल्याने चेहरा खूप खराब दिसतो आणि पिंपल्स काढून टाकल्यानंतर डाग तयार झाल्यास समस्या आणखी वाढते. त्यामुळे सुरुवातीलाच यावर योग्य तो उपाय करणे गरजेचं असते. यासाठी बहुतेक त्वचातज्ञ टोनरची मदत घेतात. टोनर म्हणजे काय? टोनर अगदी नावाप्रमाणेच आपल्या त्वचेला टोन करण्याचे […]

वापरा घरगुती ‘टोनर’

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या त्वचेकडे आपले नेहमी दुर्लक्ष होत असते. आपल्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा तेल साचल्याने चेहरा खूप खराब दिसतो आणि पिंपल्स काढून टाकल्यानंतर डाग तयार झाल्यास समस्या आणखी वाढते. त्यामुळे सुरुवातीलाच यावर योग्य तो उपाय करणे गरजेचं असते. यासाठी बहुतेक त्वचातज्ञ टोनरची मदत घेतात.

टोनर म्हणजे काय?

टोनर अगदी नावाप्रमाणेच आपल्या त्वचेला टोन करण्याचे काम करते, टोनरमुळे त्वचेवरील छिद्रे संकुचित होऊ लागतात आणि आपला चेहरा स्वच्छ दिसू लागतो. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही रोज टोनर वापरू शकता.

आपण घरीसुद्द्धा टोनर बनवू शकतो. गुलाब पाणी आणि कोरफडीच्या गर हे उत्तम टोनर म्हणून काम करतात. परंतु आपापल्या त्वचेच्या प्रकारानुसार टोनर वापरावा. लोकांच्या त्वचेवर कोरफड जेल शोभत नाही, त्याऐवजी आपण गुलाब पाणी टोनर वापरू शकता.

गुलाब पाणी टोनर : गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळा, नंतर अॅपल साईडर व्हिनेगर घालून सुमारे 15 दिवस साठवा. त्यानंतर दिवसातून ३ वेळा कापसाच्या साहाय्याने टोनर ,म्हणून चेहऱ्यावर लावा.

कडुनिंबाच्या पानांचे टोनर : कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या, हे पाणी एका कुपीत भरून त्यात अपल साइडर व्हिनेगर मिसळा. दिवसातून सुमारे 4 वेळा टोनर म्ह्णून चेहऱ्यावर लावा . नियमितपणे याचे पालन केल्याने मुरुमांमुळे होणारे डाग दूर होतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number