US-Iran War Update: मोठी बातमी! होर्मुझवरील निर्बंध हटणार, अमेरिका-इराणमध्ये महत्त्वाचा करार

आता 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (होर्मुझची सामुद्रधुनी) जगातील सर्व जहाजांसाठी खुली केली जाईल आणि इराणच्या बंदरांवर अमेरिकेकडून लादलेली नौदल नाकेबंदी त्वरित उठवली जाईल.

US-Iran War Update: मोठी बातमी! होर्मुझवरील निर्बंध हटणार, अमेरिका-इराणमध्ये महत्त्वाचा करार

अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या जवळपास चार महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रविवारी याला दुजोरा दिला. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जाहीर केले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील करार अंतिम करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, आता ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (होर्मुझची सामुद्रधुनी) जगातील सर्व जहाजांसाठी खुली केली जाईल आणि इराणच्या बंदरांवर अमेरिकेकडून लादलेली नौदल नाकेबंदी त्वरित उठवली जाईल.

या प्रकरणात पाकिस्तान आणि कतारने मध्यस्थाची भूमिका बजावली. शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, दोन्ही देश सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया पूर्णपणे थांबवण्यास सहमत झाले आहेत. यामध्ये लेबनॉनचाही समावेश आहे, ज्या मुद्द्यावरून यापूर्वी मोठा मतभेद होता. या करारावर अधिकृत स्वाक्षरी १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होईल. या करारानुसार, अमेरिका इराणच्या बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवेल. तसेच, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा पुन्हा सुरू होईल. दोन्ही देशांचे अधिकारी या आठवड्यात तांत्रिक पातळीवरील चर्चाही करतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number