Iran Israel US War: ‘डोक्याच्या बदल्यात डोकं…’, ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्यावर इराणचा अमेरिकेला थरकाप उडवणारा इशारा

दरम्यान, ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू असल्याचा दावा केला आहे.

Iran Israel US War: ‘डोक्याच्या बदल्यात डोकं…’, ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्यावर इराणचा अमेरिकेला थरकाप उडवणारा इशारा

इराण: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील शब्दयुद्ध आणखी तीव्र झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण करार करण्यास इच्छुक असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर इराणकडून अत्यंत कठोर प्रतिक्रिया समोर आली असून तेहरानने स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांच्या अटी पूर्ण झाल्याशिवाय युद्ध थांबणार नाही.

इराणचे लष्करी सल्लागार मोहसेन रेजाई यांनी ठाम शब्दांत सांगितले की, इराण कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. युद्ध थांबवायचे असेल तर इराणला झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई द्यावी लागेल, सर्व आर्थिक निर्बंध हटवावे लागतील आणि अमेरिकेने भविष्यात इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर हमी द्यावी लागेल, अशी मागणी त्यांनी केली.

रेजाई यांनी त्यांच्या विधानात अत्यंत कठोर इशाराही दिला. “यावेळी उत्तर डोळ्याच्या बदल्यात डोळा असे नसेल, तर डोक्याच्या बदल्यात डोके असेल,” असे त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, इराणची सेना पूर्ण ताकदीने कारवाई करत असून दबाव कायम ठेवण्यासाठी सातत्याने लष्करी मोहिमा सुरू आहेत. विरोधकांना अखेरीस गल्फ परिसर सोडावा लागेल, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा: Iran Israel US War: युद्ध संपण्याच्या चर्चा सुरू असतानाच बेंजामिन नेतन्याहूंचा मोठा इशारा, म्हणाले, 'कोणत्याही परिस्थितीत…'

रेजाई यांच्या म्हणण्यानुसार, हे युद्ध आठवडाभरापूर्वीच संपुष्टात येऊ शकले असते. अमेरिकाही त्यासाठी तयार होती, मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संघर्ष सुरू ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. या युद्धात स्पष्ट विजयाचा मार्ग नाही, हे आता अमेरिकेलाही लक्षात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वेगळी भूमिका मांडत अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांनी इराणमधील एका प्रभावशाली नेत्याशी चर्चा केली आहे. मात्र त्या नेत्याचे नाव त्यांनी उघड केले नाही.

या तणावाची सुरुवात 28 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या हल्ल्यांपासून झाली. त्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले केल्याचा आरोप तेहरानने केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंमधील संघर्ष वाढत गेला आणि संपूर्ण मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच अस्थिर झाली. तज्ञांच्या मते, राजनैतिक मार्गाने तोडगा निघाला नाही तर हा संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Military Flight Crashed: लष्करी विमान जंगलात कोसळले; 66 सैनिकांचा करुण अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number