उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादाची सर्वत्र चर्चा आहे. आज उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. लेखी तक्रार दाखल करण्यासाठी उर्फी वाघ महिला आयोगाच्या कार्यालयात दाखल झाली आहे. यावेळी देखील तिच्या लूकची चर्चा होत आहे.
उर्फी आज साडेबाराच्या सुमारास महिला आयोगाच्या कार्यालयात दाखल झाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे वकील सुद्धा होते. कडक सुरक्षा व्यवस्थेत उर्फीने रूपाली चाकणकर, महिला अयोग्य अध्यक्ष यांची भेट घेतली. उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीमध्ये चित्रा वाघ यांनी तिला धमकावल्याचे आणि जीवाला हानी पोचविल्याचे आरोप केले आहेत. चित्रा वाघ आणि उर्फी यांचा हा वाद गेले अनेक दिवस सुरू आहे. दोघीही एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
उर्फी जावेदच्या निर्णयानंतर चित्रा वाघ देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत उर्फीवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘माझे भांडण त्या बाईशी नाही. तिच्या विकृतीशी आहे. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतेय. पुन्हा एकदा तेच सांगते, हा समाजस्वाथ्याचा विषय आहे. हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही. चार भिंतीच्या आत तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. पण सार्वजनिक ठिकाणी, दिवसा रस्त्यावरती अशापद्धतीने उगडे-नागडे तुम्ही फिराल तर ते आम्हाला चालणार नाही. आम्ही ते चालू देणार आहे. हे माझे मत कायम असेल.’