नाशकात अवकाळी पाऊस

एकीकडे राज्याला उकाड्याने हैराण केलेले असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशकातील त्र्यंबकेश्वर, गिरणारे या भागांत संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पवसामुळे नाशिककरांना मोठा फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात दिवसांत नाशकात अचानक पडलेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाली आहेत. […]

नाशकात अवकाळी पाऊस

एकीकडे राज्याला उकाड्याने हैराण केलेले असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशकातील त्र्यंबकेश्वर, गिरणारे या भागांत संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पवसामुळे नाशिककरांना मोठा फटका बसला आहे.

ऐन उन्हाळ्यात दिवसांत नाशकात अचानक पडलेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाली आहेत. तर फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, भाजीपाला, डाळिंब, आंबा या पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमधील गिरणारे भागात अकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल आहे. तर नाशकात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वीजपुरवठा काही कालावधीसाठी खंडित करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number