उत्तर रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. माथेरानमध्ये सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अलिबागसह कर्जत, खालापूर, उरण, पनवेल या तालुक्यात देखील पाऊस बरसतो आहे. रसायनी, नावंढे, सारळ, रेवस या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आजच्या पावसाने आंबा बागायती बरोबरच वीटभट्टी मालकांचे नुकसान होणार आहे. या […]

उत्तर रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. माथेरानमध्ये सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अलिबागसह कर्जत, खालापूर, उरण, पनवेल या तालुक्यात देखील पाऊस बरसतो आहे. रसायनी, नावंढे, सारळ, रेवस या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आजच्या पावसाने आंबा बागायती बरोबरच वीटभट्टी मालकांचे नुकसान होणार आहे.

या जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number