Unseasonal Rain: ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; सांगलीसह तीन जिल्ह्यांत गारांसह मुसळधार पाऊस, पिकांचे मोठे नुकसान

सांगली, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांत अवकाळी पावसासह गारपीट झाली.

Unseasonal Rain: ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; सांगलीसह तीन जिल्ह्यांत गारांसह मुसळधार पाऊस, पिकांचे मोठे नुकसान

Unseasonal Rain: महाराष्ट्रातील सांगली, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. दिवसभर प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना रात्रीच्या सुमारास पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगली शहरात रात्री आठच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांना सुरुवात झाली. काही क्षणांतच वातावरणात मोठा बदल होऊन गारांसह जोरदार पाऊस कोसळू लागला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या वादळी पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली, तर वाहतुकीलाही काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसारच हा पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Shiv Sena Delhi Visit: एकनाथ शिंदेंपाठोपाठ शिवसेनेचा 'हा' नेताही दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण

लातूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूर, जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, औसा आणि निलंगा या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. ग्रामीण भागात या पावसाचा अधिक फटका बसला असून ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस आणखी एक धक्का ठरला आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने धडक दिली. रात्री साडे बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसोबत जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत आणि आसपासच्या ग्रामीण भागात गारपीट झाली. या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला

हेही वाचा: Chhagan bhujbal On LPG Shortage : 'LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी…' गॅस पुरवठा कधी सुरळीत होणार? भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती

या अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील फळबागा तसेच गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. दिवसभराच्या उकाड्यानंतर पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी शेतीचे झालेले नुकसान चिंतेचा विषय ठरत आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचे सत्र सुरू असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अशाच वातावरणाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number