ऑगस्टमध्ये अवकाळी आणि अतिवृष्टी

३५० वर्षांपूर्वी बुलडाणा भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली भेंडवळच्या मांडणीची प्रथा आजही सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. बहुप्रतिक्षित भेंडवळची घट मांडणी आज शनिवारी होणार असून उद्या रविवारी राज्यभरातील शेतकरी भविष्यवाणीच्या प्रतिक्षेत राहतील. शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा […]

ऑगस्टमध्ये अवकाळी आणि अतिवृष्टी

३५० वर्षांपूर्वी बुलडाणा भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली भेंडवळच्या मांडणीची प्रथा आजही सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. बहुप्रतिक्षित भेंडवळची घट मांडणी आज शनिवारी होणार असून उद्या रविवारी राज्यभरातील शेतकरी भविष्यवाणीच्या प्रतिक्षेत राहतील.

शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्य अशा या ‘घट मांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो.बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, 350 वर्षांपासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते आणि या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो, अशी ही घटमांडणी आज शनिवारी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावात होणार आहे. तर सूर्योदयानंतर याचे भविष्यवाणी जाहीर केल्या जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते.

मात्र आता येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे? हे या अंदाजानुसार जाणून घेण्यासाठी या वर्षी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हे अंदाज किती खरे ठरतात. यावर शंका असली, तरी या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विश्वास ठेवतात. आपल्या वर्षभराचे शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात.

यंदा किती पाऊस पडणार याची भविष्यवाणी या माध्यमातून व्यक्त केली जाते. ३५० वर्षापूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा सुरू केली. ही प्रथा आजच्या काळात त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. गेल्या तीन वर्षात देशावर कोरोनासारख्या भयंकर संकटाने आक्रमण केले होते. त्यामुळे याठिकाणी राज्यभरातून शेतकरी येऊ शकले नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number